उज्जैनला निघालेल्या मित्रांच्या गाडीला अपघात...तीन ठार

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
जळगाव,
Killed in an accident in Jalgaon जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. उज्जैनला दर्शनासाठी निघालेल्या मित्रांच्या वाहनाला घाटातील वळणावर अपघात झाला. या दुर्घटनेत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
 
accidenatr
 
प्राथमिक माहितीनुसार, कन्नड घाटातील तीव्र वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. घाटातील वळणावर वेग जास्त असल्याने चालकाला वाहन सावरता आले नाही आणि वाहन भीषणरीत्या अपघातग्रस्त झाले. अपघात इतका जबरदस्त होता की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कन्नड घाटातील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.