ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप! ठाकरेंच्या 'तोंडात पेढा'

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Kunal Jadhav राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी अवघे सात दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांचे पुत्र कुणाल जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 

Kunal Jadhav 
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुणाल जाधव हे प्रभाग क्रमांक ६७ मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते पक्ष नेतृत्वावर नाराज होते. अखेर या नाराजीचा परिणाम म्हणून त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
 गोटात अस्वस्थता
शिवसेना ठाकरे Kunal Jadhav  गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्थीने मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कुणाल जाधव यांनी शिवबंधन बांधत अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे अंधेरी पश्चिममधील काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.दरम्यान, मुंबईतील महापालिका निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेस-वंचित आघाडीची युती तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने बहुरंगी लढत निर्माण झाली आहे.निवडणुकीच्या अगदी तोंडावर होणारे पक्षप्रवेश, आरोप-प्रत्यारोप आणि विविध घडामोडींमुळे मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. येत्या काही दिवसांत आणखी कोणते राजकीय उलथापालथी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.