गडचिरोली,
Kupal Tumane महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (भ) अन्वये महाराष्ट्र विधानपरीषदेचे सभापती यांच्या अधिकारात गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर नागपूर येथील विधानपरीषद सदस्य कृपाल तुमाने यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.हे नामनिर्देशन विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस बळकटी देणारे ठरणार असून, आदिवासी व दुर्गम भागातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. सदर नामनिर्देशनाचा कार्यकाळ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (ब) नुसार अडीच वर्षांचा राहणार असून, कलम 62 व 63 मध्ये नमूद केलेल्या तरतुदींनुसार राहील.
गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासीबहुल व मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून, अशावेळी अनुभवी लोकप्रतिनिधीचा अधिसभेतील सहभाग विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासास दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.