मुंबई,
Navneet Rana माजी खासदार नवनीत राणा यांच्यासाठी राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर बनावट असल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला होता, मात्र मुंबईच्या माजगाव न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणा समर्थकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
2019 च्या लोकसभा Navneet Rana निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्या वेळी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांच्या ‘मोची’ जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला. आरोप होता की, राणा यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर हे प्रमाणपत्र मिळवून दिले, आणि त्याच्या आधारे नवनीत राणा यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढवली. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने प्रकरणाची Navneet Rana सविस्तर सुनावणी करताना म्हटले की, नवनीत राणा यांच्याविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे दोष सिद्ध करण्यासाठी अपुरे आहेत. नवनीत राणा यांनी सर्व आवश्यक दस्तऐवज न्यायालयात सादर केले होते, मात्र त्यांच्या वडिलांचे काही दस्तऐवज प्रस्तुत करता आले नाहीत. या तांत्रिक बाबींचा विचार करून न्यायालयाने नवनीत राणा यांना दोषमुक्त केले.तथापि, न्यायालयाने केवळ नवनीत राणा यांना दोषमुक्त केले असून, त्यांच्या वडिलांविरोधात खटला अद्यापही सुरू आहे. वडिलांनी खरोखर बनावट कागदपत्रे तयार केली होती का, याचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणात काय नवीन वळण येते आणि न्यायालय काय निकाल देते, याकडे राजकीय व कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.नवनीत राणा यांच्या दोषमुक्तीच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यांच्या विरोधकांमध्ये मात्र या प्रकरणाची आगामी कार्यवाही आणि वडिलांविरोधी खटल्याचा निष्कर्ष याबाबत चर्चा सुरू आहे.