मुंबई,
Nitesh Rane आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार आणि आक्रमक भाषण करून विरोधकांवर सडकून टीका केली. “भारतीय जनता पक्षाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर 16 तारखेला येणारी सकाळ आमचीच असेल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. राणे म्हणाले की, हिंदू समाजाला भडकवणे आणि मतांमध्ये फूट पाडणे हे प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, त्याचा सर्वाधिक फटका आज हिंदू समाजालाच बसत आहे.
भाषणादरम्यान Nitesh Rane त्यांनी मुंबईतील हिंदू लोकसंख्येच्या सातत्याने कमी होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला आणि मतदारांनी मतदान करताना केवळ भावनिक आवाहनांना बळी न पडता, उमेदवारांची पात्रता, त्यांच्या पाठीमागील ताकद आणि विकासकामांचा विचार करावा, असे आवाहन केले.नितेश राणे यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कामगिरीचे कौतुक करत सांगितले की, मुंबईतील अनेक विकासविषयक निर्णयांमध्ये प्रवीण दरेकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी मतदारांना हेही लक्षात ठेवण्यास सांगितले की, “जर कोणी विकासाच्या नावावर मत मागायला आला, तर त्याला स्पष्ट सांगा की राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच आहे.”
मराठी अस्मितेच्या Nitesh Rane मुद्द्यावर बोलताना राणे यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. “आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालो आहोत. आम्ही कोणतेही ‘चायनीज शिवसैनिक’ नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार अंगावर आले, तर शिंगावर घेण्याची आमची परंपरा आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी उत्तर भारतीयांना देखील स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “मुंबईच्या विकासाची भाषा करायची असेल, तर आधी मराठी भाषा शिका. मराठीचा सन्मान ठेवा, मगच मुंबईच्या विकासावर बोला,” असे ते म्हणाले.
मुंबईच्या विकासावर बोलताना राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीका करत संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीवर निशाणा साधला. “ही मुलाखत विकासाची नाही, तर फिक्सिंगची होती. मांजरेकर हे साडेसातनंतर बसणारे अभिनेते आहेत, तर संजय राऊतांना ठाकरे बंधूंशिवाय दुसरे कोणतेही काम नाही,” असे त्यांनी म्हटले.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना बाजूला ठेवून, केवळ अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विचार सोडले.”एकूणच, नितेश राणे यांच्या या भाषणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.