नागपूर,
ganja-smugglers : गांजा आणि ड्रग्ज विक्री राेखण्यासाठी नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ सुरु असूनही गांजा आणि ड्रग्जची विक्री आणि तस्करी करण्याच्या घटना समाेर येत आहे. मानकापूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ओडीशातील चार गांजा तस्कर सापडले. तस्करांकडून 29 किलाे 100 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. पाेलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी पाेलिसांना आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे दिसते.
गांजा तस्करीसाठी ओळखल्या जाणाèया ओडीशा राज्यातील चार तस्करांनी कारच्या डीक्कीत ेरबदल करत खाेलगट भाग तयार केला. त्यावर वेल्डिंग करत हा खाेलगट भाग बंद केला हाेता. हा वेल्डींग केलेला भाग कापून काढत पाेलिसांनी गांजा तस्करीचा डाव उधळून लावला. बलराम धाना बुरडी (23) रा. गंगागुडी जि. काेरापूट, प्रदिपकुमार श्यामसुंदर दास (50) रा. जगन्नाथ मंदिर, काेरापूट, सुरेंद्र धनराज पुजारी (18) रा. नंदापूर पाडवा, काेरापूट, जतीन मदन खिल्लाे (22) रा. नंदपूर, काेरापूट अशी ओडीशा राज्यातील चार गांजातस्करांची नावे आहेत.
पाेलिस आयुक्त डाॅ.रवींद्रकुमार सींगल यांनी अंमली पदार्थ मुक्त शहर करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, कनिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचारी आयुक्तांच्या आदेशाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या पथकाला मानकापूर परिसरात एक संशयित कार उभी दिसली. हरियाणा राज्याची नंबर प्लेट असल्याने या गाडीवर संशय आल्यानंतर पाेलिसांनी त्याची झडती घेतली. कारच्या डीक्कीत एक खाेलगट भाग वेल्डिंग केल्याचे पाेलिसांना दिसते. त्यात वाजवून पाहिले असता आत काही तरी सामान लपवल्याचा पाेलिसांना संशय आला. पाेलिसांनी छन्नी आणि हाताेड्याने ताे भाग ताेडला असता त्यात प्लास्टिकच्या पिशवीत गांजा लपवल्याचे दिसले. पाेलिसांनी 29 किलाे गांजासह चाैघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पाेलिस कर्मचारी राेशन बागडे आणि विजय यादव यांनी केली. ओडीशातून तस्करी करून आणलेला हा गांजा ते मानकापूर परिसरात काेणाला तरी देणार हाेते. नेमके काेणाच्या सांगण्यावरून त्यांनी हा गांजा नागपुरात आणला हाेता, याचा शाेध घेणे गरजेचे आहे.