तभा वृत्तसेवा
पुसद,
purushottam-thackeray : पुरुषोत्तम गजानन ठाकरे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून 2024-26 या कालावधीसाठी निवडून आलेले ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ या नॉन-प्रॉफिट संस्थेच्या भारतीय कार्यक्रमांचा कार्यभार ते सांभाळत आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध कलाकृती, मराठी चित्रपट, नाटके लोककला, संगीत, प्रवचन अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत.
‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ ही संस्था अमेरिका व कॅनडा या दोन देशातील विविध राज्यामधील 55 मंडळे म्हणजे जवळजवळ 2 लाख 50 हजार मराठी लोकांचे प्रतिनिधित्व करते. याची दखल हल्लीच भारताच्या पंतप्रधान कार्यालयानेदेखील पंतप्रधान भेटीच्या आमंत्रणातून घेतली. अलीकडेच त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचे ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक अमेरिकेच्या विविध भागांत अवघ्या 4 आठवड्यात 16 प्रयोगात सादर केले.
दामले यांनी या विक्रमी दौèयाबद्दल पुरुषोत्तम ठाकरे आणि ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’ची प्रशंसा केली. सप्टेंबर 2025 मध्ये मराठवाड्यात भीषण पूरस्थितीमुळे मोठी जीवित व वित्तहानी होऊन शेतकèयांनाही पुराचा फटका बसला. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या समाजरंग या उपक्रमांतर्गत उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाने संकटग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मराठवाडा पूरग्रस्त मदतनिधी उपक्रम सुरू केला. सुरुवातीला बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख रुपये देणगी जाहीर केली.
25 हजार डॉलरच्या निधीसंकलनाचे लक्ष्य असताना सर्वांच्या प्रेमळ आणि निःस्वार्थ योगदानाने 32 हजार 650 डॉलर निधी जमा झाला. पुरुषोत्तम ठाकरे अल्पभूधारक (1 ते 3 एकर क्षेत्रफळ) शेतकèयांना स्वयंपूर्णतेसाठी शेतीमालाचे रूपांतर उत्पादनांत करून शेतकèयांच्या हाती रोख रक्कम कशी येईल यावर ते काम करत आहेत. अमेरिका व कॅनडामध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि जन्मभूमीशी असलेली नाळ टिकवण्यासाठी त्यांची ही धडपड निश्चितच प्रेरणादायक आहे.