वन्यजीव रक्षक सचिन कोकणे विदर्भवीर पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
फुलसावंगी,
sachin-kokane : वन्यजीवांच्या संवर्धनासाठी रात्रंदिवस निस्वार्थपणे काम करणाèया फुलसावंगी येथील प्राणीमित्र, वन्यजीव रक्षक सचिन कोकणे यांना नागपूरात प्राणीमित्रांसाठी आयोजित कार्यक्रमात विदर्भवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
y8Jan-Sachin
 
 
 
वन्यजीवांसाठी निस्वार्थ कार्याची दखल घेत सचिन कोकणे यांची निवड करण्यात आली होती. सचिन कोकणे गेल्या कित्येक वर्षापासून वन्यजीवांसाठी काम करतात. वन्यजीव व पर्यावरण यांचे महत्त्व सांगताना ते अनेक उपक्रम राबवून जनजागृती करीत आहेत. प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी व त्यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने शाळा व महाविद्यालय जंगलांसभोवती राहणाèया गावातील नागरिकांना प्राणी व पर्यावरण याचे यांचे महत्त्व पटवून देत आहेत.
 
 
प्राणी व मानव यांच्यात होणारा संघर्ष कशा पद्धतीने टाळता येईल व प्राण्यांचे संवर्धन करणे यासाठी ते मोलाची भूमिका पार पाडत आहे. वन्यजीव सोबतच सचिन कोकणे चांगले पक्षी मित्र पण आहेत. आपल्या आजूबाजूला राहणारा पक्षाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी नागपूर यांनी सचिन कोकणे यांचा सत्कार केला.