समुद्रपूर,
counterfeit-liquor-flavored-tobacco-gutkha-factory : तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा तयार करून त्याची अवैध विक्री करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत ४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सुगंधीत तंबाखु, गुटखा व दारूची अवैध विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ रोजी सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा समुद्रपूर याच्या घरी छापा टाकाला असता भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश जिल्हारे, रा. उबदा उपस्थित होता. अनिकेत कांबळे व त्याचा शेजारी राहुल डोफे यांच्या घराची झडती घेतली असता देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव, सुंगधीत तंबाखु व गुटखा, खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅण्ड पॅकिजींग इलेट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने पोलिसांनी कारवाई करून ४ लाख ५३ हजार १०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तिघांविरुद्ध समुद्रपूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी मानवतकर, बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.