हिंगणघाटच्या क्रीडा विश्वाचा विराट विक्रम

१४ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात virat-bhoyar

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
हिंगणघाट, 
virat-bhoyar : विदर्भ क्रिकेट संघाच्या १४ वर्षाच्या आतील संघात हिंगणघाटचा खेळाडू विराट भोयर याची संघात उपकर्णधार म्हणून निवड झाली.
 
 
 
virat
 
 
विराट येथील येथील गिमा टेसमधील अधिकारी कैलास भोयर यांचा मुलगा असून तो सेंट जॉन विद्यालय येथे आठव्या वर्गात शिकत आहे. तो येथील पॅसीफिक क्रिकेट लबचा खेळाडू असून त्याचे प्रशिक्षक मन्नान आहेत. विराट वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. विशेष म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षापासून एनसीए क्रिकेट अकॅदमी नागपूर येथे पाच वर्ष जाणे येणे करून सराव केला. विराटने दोन वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
 
 
यापूर्वी येथील चंद्रशेखर आत्राम याची १९ वर्षाआतील भारतीय संघात निवड झालेली होती. त्यावेळी त्या भारतीय संघातील चंद्रशेखर आत्राम याने अंतिम षटकातील शेवटल्या दोन चेंडूवर षटकार व चौकार मारून भारतीय संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी विराटची १४ वर्षाखालील संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट संघांचे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांच्या नावाने खेळविल्या जाणार्‍या चषकासाठी या संघात विराटची निवड झालेली असून या स्पर्धा १५ ते ३० जानेवारी दरम्यान इंदोर ( मध्यप्रदेश ) येथे होणार आहेत