नागपूर,
Vidarbha Science Festival 2026 विज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहता विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, एम.पी.देव मेमोरियल सायन्स कॉलेज आणि संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धरमपेठ एम.पी.देव मेमोरियल सायन्स कॉलेज, अंबाझरी शुक्रवारी ९ जानेवारीला सकाळी ११ वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंगल प्रभात लोढा यांच्या शुभहस्ते उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभास सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. माने उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात विविध वैज्ञानिक प्रयोग, प्रकल्प, तंत्रज्ञान आधारित मॉडेल्स संशोधनात्मक उपक्रम सादर करण्यात येणार आहेत. या उत्सवाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेष, संशोधन वृत्ती व सर्जनशीलता विकसित हा असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा उत्सव प्रेरणादायी ठरणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. आपल्या नागपूर दौर्यादरम्यान ते आयटीआय मधील अल्पकालीन अभ्यासक्रम तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा महत्त्वपूर्ण बैठक ही घेणार आहेत.
या कार्यक्रमाला लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, नागपूर’ कुलगुरू डॉ.अतुल वैद्य,नागपूर एमआयडीसी चे उपाध्यक्ष नितीन वैद्य भारती चे संरक्षक डॉ. सतीश वाटे, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर आणि विज्ञान भारतीचे क्षेत्र संघटन मंत्री,प्रसाद यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. भारतीचे सचिव डॉ. प्रकाश इटनकर आणि धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अखिलेश पेशवे यांनी सदर कार्यक्रमास अधिकाधिक विद्यार्थी ,शिक्षक पालक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे