पुस्तक हे जगातील सर्वात मोठे मित्र : डॉ. रमेश पोखरियाल

*महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
वर्धा,
ramesh-pokhriyal : पुस्तके केवळ ज्ञानच देत नाहीत तर जीवनाला दिशा आणि चेतनाही देतात. जगात पुस्तकापेक्षा मोठा मित्र नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केले.
 
 
kjmkl
 
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात बुधवारी चार दिवसीय राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाचा स्थापना दिन ७ ते १० जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठ परिसरातील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवनाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा होत्या. विशेष अतिथी म्हणून साहित्यिक डॉ. भूषण भावे व डॉ. क्षमा कौल उपस्थित होत्या.
 
 
 
डॉ. रमेश पोखरियाल पुढे म्हणाले की, की, उत्तराखंड हे संस्कृतीचे तर वर्धा हे ज्ञान व चेतनेचे केंद्र आहे. हिंदी विद्यापीठाच्या जागतिक प्रतिष्ठेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना डायरी लेखनाची सवय लावण्याचे तसेच हिंदीला जागतिक पातळीवर प्रतिष्ठित करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले.
 
 
कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा म्हणाल्या मुद्रित पुस्तकांचे महत्त्व आजही कायम आहे आणि भविष्यातही राहील. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील क्षमतेला सकारात्मक दिशा देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. गोविंद सिंह यांनी विद्यापिठाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विकासक्रमावर प्रकाश टाकला, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेंद्र दुबे यांनी युवकांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत आणि साहित्याशी जोडले जावे असे आवाहन केले. संचालन प्राध्यापक डॉ. संदीप सपकाळे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. कादर नवाज खान यांनी मानले.