फटाक्यांचे सायलेन्सर रोड रोलरने चिरडले

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
firecracker-silencers : रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने वाहतूक नियंत्रण शाखेने मोठ्या आवाजाचे बनावट सायलेन्सर रोड रोलरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले. ही कारवाई आज गुरुवार ८ रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक बजाज चौकात केली.
 
 
j
 
शहरातील काही टवाळखोर तरुण आपल्या वाहनांना मोठ्या आवाजाचे अवैध सायलेन्सर बसवून शहरभर फिरत असतात. यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटनाही घडत असतात. या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता वाहतूक शाखेने कारवाई करीत ज्यांचा आवाज ८० डेसिबल पेक्षा जास्त होते, असे १५० सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी जप्त केलेले होते. ते सायलेन्सर न्यायालयाच्या आदेशान्वये रोलरखाली उद्ध्वस्त करण्यात आले.
 
 
ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मंगेश येळणे, संजय भांडेकर, रियाज खान, दिलीप आंबटकर, प्रशांत करंजेकर, आशिष देशमुख, किशोर पाटील, मुकेश राऊत, प्रदीप कोहळे यांनी केली. मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरू नये, फटाके फोडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले.