पोलिस अंमलदारांना नवीन वर्षाची भेट

*१५ कर्मचार्‍यांना पदोन्नती

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
wardha-news : महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून वर्धा जिल्हा पोलिस दलात पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील पात्र पोलिस हवालदार आणि पोलिस नाईक अशा १५ कर्मचार्‍यांना वरिष्ठ पदोन्नती दिली आहे. यासोबत त्यांची वेतनश्रेणी सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
 
 
police
 
जिल्ह्यातील पात्र पोलिस हवालदार आणि पोलिस नाईक यांना सेवा ज्येष्ठतेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस हवालदार पदावरून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी गजानन गहुकर (वर्धा शहर पोलिस ठाणे), प्रशांत वैद्य (वाचक शाखा, कार्यालय पोलिस अधीक्षक वर्धा), महेंद्र अढाऊ (मो. प. विभाग वर्धा), उमा कचाटे (पोलिस स्टेशन अल्लीपूर), राजेंद्र हाडके (शहर पोलिस ठाणे वर्धा), जयपाल सूर्यवंशी (गिरड पोलिस ठाणे), रवींद्र कंगाले (पोलिस मुख्यालय वर्धा), सतीश दरवरे (देवळी पोलिस ठाणे), वृंदा सुपारे (सेवाग्राम पोलिस ठाणे) यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
 
 
तर पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार पदी रवींद्र घाटुर्ले (हिंगणघाट पोलिस स्टेशन), चंद्रकांत तपासे (वा. नि. शा. वर्धा), राजेश पचारे (पोलिस स्टेशन आर्वी), योगिता जुमडे (पोलिस स्टेशन सेवाग्राम), रामदास रंधवे (पोलिस मुख्यालय वर्धा), किशोर साटोणे (पोलिस स्टेशन आर्वी) यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यासोबतच पदोन्नती देण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार यांना भरघोस वेतनश्रेणी सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
 
 
सदर पदोन्नती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाला अधीन राहून देण्यात आली आहे. ज्या मागासवर्गिय कर्मचार्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले अशा पात्र कर्मचार्‍यांनाच पदोन्नती लागू करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सर्व पदोन्नती प्राप्त कर्मचार्‍यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.