पत्नीला जिवंत जाळणार्‍या पतीला अटक

*गौतम नगरातील घटना

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
चंद्रपूर, 
wife-burned-alive : घरगुती वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना येथील महाकाली प्रभागातील गौतम नगर परिसरात घडली. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीक्षा शुभम भडके (27) असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी पती शुभम राजू भडके यास अटक केली आहे.
 
 
 
chand
 
 
 
मृतक महिलेची आजी कमला समय्या भडके (70) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दीक्षा भडके (27) ही आजी कमला भडके हिच्यासह गौतम नगर येथे राहत होती. दीक्षाचे पाच वर्षांपूर्वी शुभम भडके याच्याशी लग्न झाले होते. परंतु, गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत असल्याने शुभम आई-वडिलांसोबत वेगळा राहत होता. त्यांची पाच वर्षांची मुलगी त्रिशा आपल्या वडिलांसोबत राहत होती. 5 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता कमला भडके आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. रात्री 9 वाजता ती घरी परतली असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे दिसून आले. पण घराच्या आतून ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज ऐकू येत होता. कमला यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दीक्षा गंभीर अवस्थेत दिसली. तिचे कपडे आणि केस जळाले होते. कमला भडके यांनी तातडीने दीक्षाला शेजार्‍यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 7 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.
 
 
दीक्षाचा नवरा शुभम भडके याला दारूचे व्यसन होत. तो दारूच्या नशेत घरी येऊन पत्नी दीक्षा आणि आजी कमला भडके यांना मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी दीक्षा घरात एकटीच होती. शुभम भडके यांनी हत्या करण्याच्या हेतूने तिला जिवंत जाळले व घराच दरवाजा बाहेरून बंद करून निघून गेला. या प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी कलम 109 (1) अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु, दीक्षाच्या मृत्यूनंतर कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शुभम भडके याला अटक केली.