नवनिर्वाचित नप अध्यक्ष सुनील चिरडे यांचे पदग्रहण

हरीपाठाच्या गजरात स्वीकारला पदभार

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
sunil-chirde : शिवसेनेचे नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष सुनील नामदेव चिरडे यांचा बुधवार, 7 जानेवारीला पदग्रहण सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात नप अध्यक्ष सुनील चिरडे यांच्यासह शिवसेनेचे 12 नगरसेवक यांचे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर हरिपाठाच्या गजरात मिरवणूक काढत बसस्थानक चौक, गोळीबार चौक ते नप कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
 
 

y8Jan-Chirade 
 
 
 
मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सुनिल चिरडेसह 12 नगरसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर चिरडे यांनी मंत्रोपचारात विधिवत नप अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर नप सभागृहात 22 नगरसेवकांसह नप अध्यक्ष सुनील चिरडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहरप्रमुख राजू दुधे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सुनील चिरडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नवनियुक्त नप अध्यक्षांनी 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला
 
 
शिवसेनेचे नप अध्यक्ष सुनील चिरडे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या स्वागतीय भाषणात पुढील 100 दिवसांत करण्यात येणाèया कामांचा कृती आराखडा जाहीर केला. नपच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वेबसाईट अपडेट करण्यात येईल. नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन दिले जाईल. शहराच्या पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देऊन स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेकडे व पार्किंग सुविधेकडे विशेष लक्ष दिल्या जाईल, प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भर दिला जाईल, विकास कामांची कालमर्यादा निश्चित केल्या जाईल, नपच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, शहर सौंदर्यीकरणासाठी विशेष प्रयत्न केल्या जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.