गोरेगाव,
goregaon nagar panchayat election गोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी वाटपातील गोंधळ आणि पक्षातंर्गत बंडखोरी भाजपला चांगली भोवली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला. नगरपंचायत निवडणुकीत भाजपला फक्त ५ जागेवर समाधान मानावे लागले. यातच आ. विजय रहांगडाले व गटनेता आशिष बारेवार यांनी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा महामंत्री, शहर पदाधिकार्यांना डावलून आपल्या मर्जीतील व्यक्तीस गोरेगाव नगरपंचायतीत स्विकृत सदस्यपदी निवड केल्याने भाजपात असंतोष पाहायला मिळाला. नगरपंचायत स्विकृत सदस्य निवडीतही पदाधिकार्यांना विश्वासात न घेता मयूर राजा कटरे यांच्या नावाचे सहमती अर्ज जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या अन्यायाविरुद्ध भाजपच्या १०० पदाधिकार्यांसह, कार्येकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांना ८ जानेवारी रोजी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. तसेच विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, गोंदिया जिल्ह्याचे संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर यांना राजीनाम्याची प्रत दिल्याची माहिती शुक्रवार, ९ जानेवारी रोजी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला माजी नपं सभापती हिरालाल रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष संजय बारेवार, शहराध्यक्ष मेघनाथ पारधी, तुका उपाध्यक्ष कुसन चौधरी, माजी नपं सभापती रेवेंद्र बिसेन, महामंत्री शहर नरेंद्र पटले, अनिल राऊत, मोरेश्वर रहांगडाले, देवेंद्र येडे, अंकित रहांगडाले, आरती पटले, मुकेश खरोले यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संजय बारेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. विजय रहांगडाले व गटनेता आशिष बारेवार यांनी नगरपंचायत निवडणुकीत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, माजी आमदार, शहर अध्यक्ष यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीतील व्यक्तीस उमेदवारी दिली. पक्षाचे पदाधिकारी असल्याने पक्षाचे काम केले, पण मतदारांनी या उमेदवारांना नाकारल्याने ५ नगरसेवक निवडल्या गेले. स्विकृत सदस्य निवड करण्यासाठी ५ पदाधिकार्यांचे नाव पक्ष सभेत देण्यात आले. आ. विजय रहांगडाले व गटनेता आशिष बारेवार यांनी हे वगळून ७ जानेवारी रोजी आठवडी बाजाराचे कंत्राटदार असलेले मयूर राजा कटरे याचे कंत्राटदाराचे नाव कमी करून नगरपंचायत स्विकृत सदस्याकरिता जिल्हाधिकार्यांच्या नावाचे अर्ज दाखल करण्यात आल्याने स्विकृत सदस्य म्हणून नाव समोर आले.goregaon nagar panchayat election त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक, निवडणुकीत पराजीत झालेल्या उमेदवारावर हा अन्याय झालेला आहे. यापुर्वी आ. रहांगडाले यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी खरेदी विक्री संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून गटबाजी केली. तसेच नगरपंचायत निवडणुकीतही गटबाजी केल्याने गोरेगावात भाजप उमेदवार पराभूत झाले आहेत. या अन्यायाविरुद्ध भाजप पदाधिकार्यांसह, कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांना दिला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.