अमरावतीला निधी विरणात झुकतेमाप

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही -राष्ट्रवादीला मत देण्याचे केले आवाहन

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
अमरावती,
ajit pawar अमरावती हे पाच जिल्ह्याच्या विभागाचे शहर आहे. या शहराचा विकास इतर प्रमुख शहराप्रमाणे झपाट्याने झाला पाहिजे. त्यासाठी अमरावतीला येत्या अर्थसंकल्पापासून निधी वितरणात झुकतेमाप देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
 

अमरावती  
 
 
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शुक्रवारी गाडगेनगर येथील मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे महासचिव आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार देवेंद्र भुयार, सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे, प्रशांत डवरे यांच्यासह अन्य नेते व उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले, मी काम करणारा माणूस आहे. विकास करायला मला आवडतो. हा विकास तेव्हाच होईल, जेव्हा सलोख्याचे वातावरण व शांताता राहील. अशांतता राहीली तर गुंतवणूक करणारे येत आहे. अमरावतीत शांतता भंग करण्याचे काम काही मंडळी करीत आहे. गुंडगिरी व दहशत पसरविण्याचे काम करत आहे. त्यांची दहशत आपण मोडून काढू व सखोल्याला प्राधान्य देऊ. निंदानालस्ती, अरोप करून विकास होत नाही. लोकांची डोकी भडकाऊ नका, डोके शांत ठेवा आणि विकासावर लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातली अन्य शहरे झपाट्याने विकसीत होत आहे. त्या तुलनते अमरावतीचा विकास झाला नाही. अमरावती विभागीय मुख्यालय असल्याने अधिकचा निधी दिल्यावर विकास शक्य आहे. भविष्यात तो निश्चितपणे दिला जाईल. अमरावतीला नुकतेच सी-ट्रीपल आयटी केंद्र मंजूर केले. राज्यात ते मोजक्याच ठिकाणी आहे. पीएमआवस योजनेतून घरकुले देण्याला अमरावतीला प्राधान्य दिले जाईल.ajit pawar याशिवाय अन्य मुद्दे त्यांनी मांडले. तत्पूर्वी आ. सुलभा खोडके यांनी प्रास्ताविकातून शहर विकासाठी आवश्यक असेले मुद्दे मांडले. त्यातील बहुतांश मागण्या अजित पवार यांनी आपल्या भाषणातून मंजूर केल्या. सभेला मोठ्या संख्येने शहरातल्या नागरिकांची उपस्थिती होती.
उड्डानपुलासाठी अर्थसंकल्पात तरतुद
राजकमल रेल्वे उड्डानपुल हा अंत्यत महत्त्वाचा आहे. तो वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतुद केली जाईल. मी शब्दाचा पक्का आहे, हा माझा वादा आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेतून अमरावतीचा संपूर्ण विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
जाहीर सभेत विकासाचे मुद्दे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात विकासाचे मुद्देच मोठ्या प्रमाणात मांडल्या गेले. खुद्द पवार यांचे भाषण विकास केंद्रीतच होते. तत्पूर्वी आ. सुलभा खोडके यांनी सुद्धा शहराच्या विकासाठी काय आवश्यक आहे, याचीच मागणी त्यांच्याकडे केली.