बावन्नी रचनाकार प्रा. शेवडे यांची श्रींच्या मंदिराला भेट

मंदिरात झाले सामुहिक बावन्नी पठन

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
वाशीम, 
prof shevde श्री संत गजानन महाराज बावन्नीचे रचनाकार प्रा. सुरेशआबा शेवडे यांनी ९ जानेवारी रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर, आय. यु. डी. पी. कॉलनी, वाशीम येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीचे आयोजन मंदिर समितिचे विश्वस्त राम पाटील यांनी केले होते. सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज सेवा समिती (ट्रस्ट) च्या वतीने प्रा. शेवडे यांचे शाल व श्रीफळ देऊन व पुष्पमाला घालून मंदिर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
 

bavanni 
 
 
त्यानंतर आबांना संपूर्ण मंदिर परिसराचे दर्शन घडविण्यात आले तर मंदिर परिसर पाहून मन प्रसन्न झाल्याचे मनोगत व्यक्त करताना आबांनी मंदिर संस्थानचे दयाराम राऊत व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित भक्तांना मयुर राऊत यांनी श्री संत गजानन महाराज बावन्नीचे वितरण करण्यात केले व लगेच मंदिरात सामुहिक बावन्नीचे पठन करण्यात आले. बावन्ननीच्या रचनाकारांसोबत बावन्ननीचे पठन करताना गजानन भक्तांचा आनंद गगनाला टेकला होता.prof shevde या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुनिता गणेश राऊत, संगीता प्रल्हाद राऊत, अरुंधती पाटील यांच्या सोबत परिसरातील भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजनीकांत राऊत, पुष्कर टोलमारे, पंकज गोटे, दीपक देशपांडे यांनी अथक परिश्रम घेतले.