बिहार सरकारचा मोठा निर्णय: एकाच वेळी ७१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
पाटणा,  
bihar-71-ips-officers-transferred बिहारमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. एकाच वेळी तब्बल ७१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात व्यापक फेररचना झाली आहे. अनेक जिल्ह्यांना नवे एसपी आणि एसएसपी मिळाले असून, मुख्यालय, सायबर गुन्हे शाखा, रेल्वे पोलिस तसेच विशेष दलांमधील जबाबदाऱ्यांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
 
bihar-71-ips-officers-transferred
 
जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार संतोष कुमार यांची किशनगंज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर कांतेश कुमार मिश्रा यांच्याकडे मुझफ्फरपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जितेंद्र कुमार आता अररिया जिल्ह्याचा पोलीस कारभार सांभाळतील, तर विनय तिवारी यांची गोपाळगंजचे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील विशेष यंत्रणांमध्येही मोठे बदल झाले आहेत. bihar-71-ips-officers-transferred हृदयकांत यांच्याकडे दहशतवादविरोधी पथकाची धुरा देण्यात आली असून, सुशील कुमार यांची गयाचे एसएसपी म्हणून नेमणूक झाली आहे. रेल्वे पोलिस व्यवस्थेत अनंत कुमार यांची एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पटना रेल्वे पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी अनंत कुमार राय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भागलपूरच्या एसएसपीपदी प्रमोद कुमार यादव, तर सारण जिल्ह्याच्या एसएसपीपदी विनीत कुमार यांची नियुक्ती झाली आहे. पाटणातील वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सागर कुमार यांच्याकडे देण्यात आली असून, सिवानचे एसपी म्हणून पूरण कुमार झा, अरवलचे एसपी म्हणून नवजोत सिमी यांची नेमणूक करण्यात आली आहे. bihar-71-ips-officers-transferred याशिवाय बगाहा जिल्ह्याचे एसपी म्हणून रामानंद कौशल, लखीसरायचे एसपी म्हणून अवधेश दीक्षित आणि शिवहरचे एसपी म्हणून शुभांक मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली जिल्ह्याचे एसपी म्हणून विक्रम सिहाग, तर जहानाबादचे एसपी म्हणून अपराजित यांची नेमणूक झाली आहे.
पाटणामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे एसडीपीओ म्हणून दिव्यांजली जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर गुन्हे आणि सुरक्षा युनिटचे आयजी म्हणून रणजित कुमार मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, मनोज कुमार यांना डीआयजीवरून बढती देत आयजी (मुख्यालय) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. bihar-71-ips-officers-transferred वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रीता वर्मा यांची बिहार पोलिस इमारत बांधकाम महामंडळाच्या महासंचालक आणि अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुंदन कृष्णन यांच्याकडे एसटीएफचे डीजी (ऑपरेशन्स) आणि विशेष शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लखीसरायचे एसपी अजय कुमार यांची बदली करण्यात आली असून, त्यांना बिहार स्पेशल आर्म्ड पोलिस (एसएपी) पाचव्या बटालियनचे कमांडंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी अवधेश दीक्षित यांची लखीसरायच्या नव्या एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यापक फेरबदलांमुळे बिहारमधील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करेल आणि कायदा व सुव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.