जकार्ता,
doraemon nobita removed from rcti पिढ्यानपिढ्या इंडोनेशियातील लाखो घरांमध्ये रविवारची सकाळ ‘डोरेमॉन’ पाहत सुरू होत असे. २२व्या शतकातून आलेली निळी रोबोट कॅट आणि तिचा मित्र नोबिता यांच्या गोष्टींनी मैत्री, जबाबदारी आणि कल्पनाशक्तीचे धडे देत संपूर्ण एक पिढी घडवली. मात्र आता तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या लोकप्रिय जपानी ॲनिमे शोचा इंडोनेशियन टेलिव्हिजनवरील प्रवास अचानक थांबला आहे. राजावली सिट्रा टेलिव्हिसी इंडोनेशिया (RCTI) या प्रमुख चॅनेलच्या कार्यक्रम यादीतून ‘डोरेमॉन’ काढून टाकण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डोरेमॉन आणि नोबिताच्या doraemon nobita removed from rcti दैनंदिन आयुष्यातील गंमतीशीर प्रसंग, भविष्यकालीन गॅझेट्स आणि त्यातून मिळणारे जीवनाचे धडे हे या मालिकेचे वैशिष्ट्य होते. २०२५ च्या अखेरीस हा शो आरसीटीआयच्या वेळापत्रकातून शांतपणे हटवण्यात आला. तब्बल ३७ वर्षांहून अधिक काळ इंडोनेशियन टेलिव्हिजनवर सातत्याने प्रसारित झालेल्या या मालिकेचा असा अचानक शेवट होईल, याची कल्पनाही चाहत्यांना नव्हती.
या निर्णयाबाबत आरसीटीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. त्यामुळे ४ जानेवारी २०२६ पासून सोशल मीडियावर प्रेक्षकांचा संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी चॅनेलच्या इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत ‘डोरेमॉन’ परत सुरू करण्याची मागणी केली आहे. “डोरेमॉन आमच्या बालपणाचा अविभाज्य भाग होता,” “तो बंद झाल्यानंतर आरसीटीआय पूर्वीसारखा वाटत नाही,” अशा भावना मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान, ‘कॅटाटन फिल्म’ या सत्यापित इंस्टाग्राम अकाउंटने शेअर केलेल्या माहितीनुसार, RCTI+ वेबसाइटवरील कार्यक्रम डेटामध्ये ‘डोरेमॉन’ २९ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळापत्रकातून वगळल्याचे दिसून येते. तसेच अलीकडच्या काही महिन्यांत ‘डोरेमॉन’ चित्रपटांचे प्रसारणही क्वचितच करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
इंडोनेशियात ‘डोरेमॉन’चा प्रवास doraemon nobita removed from rcti १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झाला. ९ डिसेंबर १९९० रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि लवकरच तो देशाच्या लोकप्रिय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. सुरुवातीला आरसीटीआयची पोहोच जकार्तापुरती मर्यादित असल्याने हा शो एससीटीव्हीवर दाखवण्यात येत होता. नंतर आरसीटीआयचा देशभर विस्तार झाल्यावर ‘डोरेमॉन’ कायमस्वरूपी या चॅनेलवर प्रसारित होऊ लागला. विशेष म्हणजे, जपानबाहेर इंडोनेशियन डबिंगसह अधिकृतपणे प्रसारित होणारे हे पहिले ॲनिमे होते.१९७९ मध्ये जपानमध्ये पहिल्यांदा प्रसारित झालेल्या ‘डोरेमॉन’ने विज्ञानकथा, विनोद आणि भावनिक नात्यांचे अनोखे मिश्रण सादर केले. इंडोनेशियातील मुलांमध्येही या मालिकेने मैत्री, नैतिकता आणि कल्पनाविश्व यांचे महत्त्व रुजवले. त्यामुळे या शोचे अचानक बंद होणे केवळ एक कार्यक्रम थांबणे नसून, संपूर्ण एका पिढीच्या आठवणींना पडलेला पडदा असल्याची भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत.