रिसोड,
journalist banore पत्रकार दिनानीमीत्त शिर्डी येथे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केलेल्या मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने हॉटेल शांती निकेतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे होते तर प्रमुख अथिती म्हणून शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरक्ष गाडिलकर, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, प्रिती चौधरी, संत अवदुत गिरी महाराज, जादुगार डि. लाल उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व साईबाबाच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करण्यात आला.

रिसोड येथील पत्रकार गजानन बानोरे यांनी पत्रकारीता क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरक्ष गाडिलकर, नगराध्यक्षा जयश्री थोरात यांच्या हस्ते शाल, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गजानन बानोरे हे १९८९ पासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या ३६ वर्षापासून त्यांचे हे कार्य अविवरत सुरु आहे. १९८९ ला महाराष्ट्र शासनचा विकास वार्ता पुरस्कार, २००६ ला राज्यस्तरीय एकता गौरव पुरस्कार, २०१५ ला संभाजीनगर येथील अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने अण्णाभाऊ स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल २०१७ प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर इंटरनॅशनल अचिवर्स पुस्काराने त्यांचा शिर्डी येथे सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ पगार व त्यांच्या सहकार्यानी परिश्रम घेतले.