कानपूरमध्ये दृश्यमसारखी घटना: ७ मुलांच्या आईची हत्या करून मृतदेह खड्ड्यात पुरवला

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
कानपुर, 
kanpur-mother-of-seven-children-murdered उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. चित्रपट ‘दृश्यम’ची आठवण करून देणाऱ्या या प्रकरणात एका महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत गाडण्यात आला होता. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी गोरेलाल शंखवार आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.
 
kanpur-mother-of-seven-children-murdered
 
ही घटना सतेजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिकवांपूर गावातील आहे. येथील रहिवासी रामबाबू शंखवार याचा कर्करोगामुळे पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी रेशमा हिने सात मुलांना सोडून शेजारी राहणाऱ्या गोरेलाल शंखवारसोबत राहण्यास सुरुवात केली होती. एप्रिल महिन्यात रेशमा गोरेलालसोबत इटावाला गहू कापणीसाठी गेली होती, मात्र तेथून परतल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. kanpur-mother-of-seven-children-murdered काही महिने उलटून गेल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी एका लग्नसमारंभात रेशमाचा मुलगा बबलू याने गोरेलालकडे आईबाबत विचारणा केली असता, “ती आता कधीच परत येणार नाही,” असे उत्तर त्याला देण्यात आले. या उत्तराने संशय बळावल्याने बबलूने ५ जानेवारी रोजी एसीपी कार्यालयात तक्रार दाखल करत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
एसीपींच्या आदेशानुसार पोलिसांनी गोरेलालला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक चौकशीत तो तुटला आणि रेशमाची हत्या केल्याची कबुली दिली. गोरेलालने सांगितले की, रेशमा त्याच्यापेक्षा वयाने सुमारे १२ वर्षांनी मोठी होती, ती सात मुलांची आई होती आणि तिचे इतर व्यक्तीसोबत संबंध निर्माण झाले होते. या कारणांमुळे तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्याने तिची हत्या करून तीन फूट खोल खड्ड्यात मृतदेह गाडला. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून जमिनीतून महिलेचे अवशेष बाहेर काढले. kanpur-mother-of-seven-children-murdered या घटनेने पोलीस अधिकारीही हादरून गेले. एसीपी कृष्णकांत यादव यांनी सांगितले की, मुख्य आरोपी गोरेलालला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेशमा मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्यावर ठाम होती, यावरून घरात वारंवार वाद होत होते. अखेर हा वाद तिच्या जीवावर बेतल्याचे या धक्कादायक घटनेतून समोर आले आहे.