राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यांची बाजार समितीला भेट

शेतकर्‍यांच्या समस्यांचा वाचण्यात आला पाढा

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
मानोरा,
agricultural price commission शहरामध्ये असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाची सदस्य दीपक बापूजी पगार यांनी नुकतीच भेट देऊन शेतकर्‍यांच्या तथा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या. मानोरा तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावात खरीप रब्बी आणि उन्हाळी कृषी पिकांना दर मिळावे.
 

राज्य कृषी मूल्य  
 
उन्हाळा, हिवाळा आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये बाजार समितीमध्ये विविध प्रकारचे धान्य विकण्यासाठी आणणार्‍या बळीराजाला जागा मिळावी, शेतकरी बांधवांना बाजार समितीमध्ये किमान मूलभूत सुविधा मिळाव्या याकडे राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य दीपक पगार यांच्या पुढे रयतक्रांती संघटनेचे वाशीम जिल्हा अध्यक्ष हर्षद देशमुख यांनी लक्ष वेधले. गतवर्षी बोरव्हा या गावातील अल्पभूधारक उन्हाळी भुईमूग उत्पादक शेतकर्‍याची बाजार समितीमध्ये विकायला आणलेली भुईमूग सर्वांच्या डोळ्यात देखत वाहून गेली होती ज्याची दखल देशाच्या केंद्रीय कृषी कल्याण मंत्र्यांना घेण्याची पाळी आली होती.agricultural price commission कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया द्वारा खरेदी करण्यात येत असलेल्या कपाशी पीक विक्रीमध्ये तालुयातील शेतकर्‍यांना मोठ्या अडचणी लासामोरे जावे लागत असून, तांत्रिक अडचण सातत्याने निर्माण होत असल्याने शेतकरी मिटाकुटीस आलेला आहे ही बाब सुद्धा राज्य कृषी मूल्य आयोगाची सदस्य बाजार समितीमध्ये आले असता प्रकर्षाने त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव यांची भेट कृषी मूल्य आयोगाची सदस्य पगार यांनी यावेळी घेतली. भेटी दरम्यान भाजपा मानोरा मंडळ अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, युवा मोर्चा अध्यक्ष श्याम डोळस, मनोज खडसे, रितेश घाडगे, विनायक पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.