नागपूर,
Nagpur तालुका विधी सेवा समिती, सावनेरच्या वतीने पंचायत समिती, सावनेर येथे आज कलम 498-A, 304-B IPC आणि दहेज प्रतिबंध कायद्यावरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात एस.ए. सरदार (वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश), पि.पि. ठाकुर (कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश), एस.एम. गाडे (सह दिवाणी न्यायाधीश) तसेच अधिवक्ता एम. पी. चौधरी व यु. आर. पवार यांनी उपस्थित महिलांना कायद्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.वाय. निंबाळकर (सचिव, तालुका वकील संघ, सावनेर) यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका वकील संघाचे अध्यक्ष एस.पी. जैन यांनी केले.
सौजन्य: अनिल सोलनकी, संपर्क मित्र