सोशल मीडियाचा पारा चढला 'तो' व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला!

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
मुंबई,

prince narula viral video ‘रोडीज’ आणि ‘बिग बॉस’सारखे लोकप्रिय रिॲलिटी शो जिंकून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रिन्स नरुला गुरुवारी अचानक चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्रिन्सला काही पोलिस कर्मचारी घेऊन जात असल्याचे दिसत होते. या व्हिडिओमुळे दिल्लीतील मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर प्रिन्सला अटक करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या आणि त्याच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
 

prince narula viral video 
मात्र, या व्हायरल व्हिडिओमागील सत्य लवकरच समोर आले आहे. प्रिन्स नरुलाने ‘टेलीचक्कर’शी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, त्याला कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. “हा व्हिडिओ एका शूटचा भाग आहे. तो एका बँडसाठी केलेल्या शूटमधील सीन असून, याचा वास्तवातील अटकेशी काहीही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण त्याने दिले. या खुलाशानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
 
 
व्हायरल व्हिडिओमध्ये prince narula viral video प्रिन्स पोलिसांसोबत दिसत असला, तरी अटकेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. व्हिडिओतील त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता पाहूनही अफवांना अधिक बळ मिळाले. काही चाहत्यांनी तर व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी एआय टूल्सचा वापर केला, ज्यातून हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले.दरम्यान, प्रिन्स नरुला याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबतही तो नेहमीच चर्चेत असतो. ‘रोडीज’दरम्यान एल्विश यादवसोबत झालेल्या वादामुळे तो आधीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आक्रमक स्वभाव आणि बेधडक वक्तव्यांमुळे तो ओळखला जातो. प्रिन्सने अभिनेत्री युविका चौधरीशी विवाह केला असून, या दाम्पत्याला एक मुलगी आहे. अलीकडे दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्यांनी त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.एकूणच, व्हायरल झालेल्या अटकेच्या व्हिडिओमुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून, हा प्रकार केवळ शूटसाठी रचलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.