बुलढाणा नगरपरिषदेच्या तीन स्विकृत सदस्य जागांसाठी प्रस्ताव दाखल

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
बुलढाणा,
buldhana municipal council बुलढाणा नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेले आवेदन अर्ज नगरविकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त, बुलढाणा यांच्याकडे अधिकृतरीत्या अर्ज आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले.
 

buldhna 
 
 
बुलढाणा नगरपरिषदेतील तीन स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी शिवसेनेच्या वतीने हे अर्ज सादर करण्यात आले असून, यामुळे नगरपरिषदेतील लोकाभिमुख विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बुलढाणा नगर पालिकेच्या तीन स्विकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उदय देशपांडे, प्रा.सुनिल सपकाळ, मोहन पर्‍हाड यांना संधी देण्यात आली आहे. या पदासाठी एकही विरोधक नसल्याने इतरांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत. दि. १३ जानेवारी रोजी बिनविरोध घोषणा होणार आहे. बुलढाणा नगर पालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. २१ डिसेंबर झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या पुजा संजय गायकवाड या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
आ.संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आणत बुलढाणा नगर पालिकेत इतिहास घडवला. राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य कुणाल संजय गायकवाड यांची बुलढाणा नगर पालिकेच्या गटनेते पदी निवड करण्यात आली. नगराध्यक्षांचे एक मत असे मिळून कुणाल गायकवाड यांना ३० जणांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा नगर पालिकेच्या स्विकृत नगरसेवकांसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा यांच्याकडे पुरसे संख्या बळ नसल्याने कुणी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शिवसेनेकडून उदय देशपांडे, प्रा.सुनिल सपकाळ, मोहन पर्‍हाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.buldhana municipal council आता नगर पालिकेत शिवसेना गटाचे संख्याबळ ३३ झाले आहे. या प्रसंगी नगरसेवक गजेंद्र दांदडे, सचिन गायकवाड, बबलू अमित मावतवाल, योगेश परसे, देवेन खोत, सागर घट्टे, विजयसिंग राजपूत, सुनील सपकाळ, उदयदादा देशपांडे, मोहन पर्‍हाड, अरविंद होंडे, मंगेश बिडवे, सचिन हिरोळे, ज्ञानेश्वर वाघ, ज्ञानेश्वर खांडवे, वरुण कुळकर्णी, सचिन कोठाळे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, विद्यमान व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.