सरस्वती शिशु मंदिरात वार्षिकोत्सव साजरा

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Saraswati Shishu Mandir सरस्वती शिशु मंदिरात शैक्षणिक सत्र २०२५–२६ चा वार्षिकोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवनगर सांस्कृतिक सभेचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर होते. त्यांनी बुद्धीच्या जागृतीसह नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व विशद केले.
 
 
van
 
 
प्रमुख अतिथी ॲड. निकिता शिरसाट यांनी नामदेव व साने गुरुजी यांच्या कथांद्वारे नैतिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अनघा घाटे यांनी केले.Saraswati Shishu Mandir विद्यार्थ्यांची प्रदर्शनी, पालक स्पर्धा व बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली, अशी माहिती मुख्याध्यापिका संध्या अग्निहोत्री यांनी दिली.
सौजन्य:अश्विनी बोरीकर,संपर्क मित्र