‘५ वर्षांनंतर ना शिंदे राहतील ना अजित पवार’; ओवैसींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा दावा

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
धुळे,  
owaisi-on-maharashtra-politics धुळ्यात झालेल्या जाहीर सभेत एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसकडून एआयएमआयएमला भाजपची ‘बी-टीम’ ठरवण्याच्या आरोपांना त्यांनी थेट प्रत्युत्तर दिले. असे आरोप हे सत्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी केले जात असल्याचे ओवैसी म्हणाले.
 
owaisi-on-maharashtra-politics
 
सभेत बोलताना त्यांनी मुंबई लोकल बॉम्बस्फोटांचा मुद्दा उपस्थित करत न्यायव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या स्फोटांत १८५ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेले ११ मुस्लिम युवक जवळपास १९ वर्षे तुरुंगात होते, याकडे ओवैसींनी लक्ष वेधले. “त्या तरुणांनी आयुष्यातील मोलाची १९ वर्षे सळाखी मागे घालवली, याचा विचार कोणी करतो का?” असा सवाल करत त्यांनी उपस्थितांना अस्वस्थ केले. owaisi-on-maharashtra-politics महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना ओवैसींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधला. आपल्या चुलत काका शरद पवारांपासून वेगळे होण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. “जो स्वतःच्या कुटुंबासमोर ठाम उभा राहू शकला नाही, त्याच्या मागे डोळे बंद करून जाणाऱ्यांचे भवितव्य काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ओवैसींनी यावेळी मोठा दावा करत सांगितले की, पुढील पाच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत ना एकनाथ शिंदे राजकारणाच्या केंद्रस्थानी असतील, ना अजित पवार. त्या काळात केवळ एआयएमआयएमच आपली भूमिका ठामपणे मांडत मैदानात टिकून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. owaisi-on-maharashtra-politics संसदेतील आपल्या भूमिकेचा उल्लेख करताना ओवैसी म्हणाले की, बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेले कायदे जेव्हा संसदेत मांडले गेले, तेव्हा त्यांनी त्यांना उघडपणे विरोध केला. “असे धाडस अजित पवार करू शकतात का?” असा टोला त्यांनी लगावला. शेवटी ओवैसींनी स्पष्ट केले की, एआयएमआयएम ही पक्ष केवळ सत्तेसाठी नव्हे, तर जनतेचे हक्क आणि संविधानिक मूल्यांसाठी लढणारी आहे. ठोस विचारसरणी ही मजबूत वडाच्या झाडासारखी असते, जी काळ बदलला तरी उभी राहते; तर स्वार्थावर उभ्या राहिलेल्या युती या पावसाळी रोपट्यासारख्या असतात, ज्या थोड्याच काळात कोमेजून जातात, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली.