धानोरा,
dhanora news धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेकीनमूडझा येथील शाळेत एकूण विद्यार्थी संख्या 36 असून या शाळेत एक ते पाच वर्गापर्यंत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवून गैरसोय होत आहे. यामुळे पाच दिवसांच्या आत शिक्षक उपलब्ध करून द्या, अन्यथा शिक्षण विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवून विद्यार्थी बसवू, असा ईशारा धानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना 6 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात पेकीनमुडझा येथील गावकर्यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांचे पालक धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले असता, गटविकास अधिकारी हे शासकीय दौर्यावर असल्याने त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संवाद साधला व कार्यालयात याबत निवेदन देण्यात आले. संबंधित विभागाकडे शिक्षक नसल्यास या भागातील पात्र सुशिक्षित बेरोजगार डीएड व बीएड धारकांना तरी त्या शाळेत सामावून घ्यावे.dhanora news पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता, लवकरात लवकर शिक्षकांना शाळेत रुजू करावे, अशी विनवणी गावातील नागरिक व पालक वर्गाकडून करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आतिश खोबरागडे, उपाध्यक्ष कैलास मडावी, सदस्या आशा सोनुले, अंबादास मडावी, भाग्यश्री कावळे, सरपंच पंढरीनाथ कावळे, सरपंच संजय गावडे, पंकज गजभिये, मीनाक्षी उईके, शशिकला खोब्रागडे, लतीफखा पठाण, संतोष मोहूर्ले, गोपाल कावळे यांच्यासह परिसरातील नागरिक व पालक वर्ग उपस्थित होते.