दर्यापुरातल्या अपघातात प्राचार्याचा मृत्यू

माहेश्वरी भवनाजवळची घटना

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
दर्यापूर,
principal died an accident दर्यापूर-अकोट मार्गावरील माहेश्वरी भवन जवळ सिलेंडरच्या ट्रक खाली येऊन झालेल्या भीषण अपघातात दर्यापूर मधील नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बालासुब्रमणी नचिमुथू (रा. तामिळनाडू) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते गुरुकुल बीएससी नर्सिंग कॉलेज, शिवर रोड, दर्यापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या अपघातामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

accident 
 
 
माहितीनुसार, प्रा. डॉ. नचिमुथू हे आपल्या दुचाकी क्रमांक टीएन ३८ सीपी ५३१६ ने काही कामानिमित्त दर्यापूर-अकोट मार्गावरून जात होते. अपघात स्थळ हे नेहमी वाहनांनी गजबजलेले असते. दरम्यान माहेश्वरी भवनाजवळ त्यांच्या दुचाकीला सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रक क्रमांक एमएच ४९ बीझेड १२२५ ने मागील बाजुने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून, तरीदेखील वाहतूक नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.principal died an accident त्यामुळे पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गुरुकुल बीएससी नर्सिंग कॉलेजमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून प्राचार्य डॉ. नचिमुथू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.