कचरा डेपो विरोधात नागरिकांचा मोर्चा

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
बुलडाणा,
protest march against garbage depotमाळविहीर परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे लिखीत तक्रार करीत माळविहीरच्या कचरा डेपोला विरोध केला आहे माळविहीर ग्रामपंचायतने ग्रामसभेत अधिकृत ठराव घेवून हनवतखेडचा कचरा डेपो माळविहीरला हलवू नये असा ठराव घेतला आहे. याउपरही प्रशासन माळविहीरसाठी अट्टाहास का करीत आहे असा प्रश्न शेकडो ग्रामस्थांनी दि. १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
 

garbej
या मोर्चात माळविहीर सावळा, सुंदरखेड, पोखरी, भादोला वाडी आणि लगतच्या परिसरातील बुलढाण्याच्या नागरिकांनी धडक मोर्चात उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता. डंपींग ग्राऊण्ड परिसरातील शेतकर्‍यांनी तर आत्महत्येचाही इशारा आंदोलनातून दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा शहरातील कचरा हनवतखेड परिसरात फेकला जात आहे, मलकापूर रोडवरील या भागात कचरा डेपा बनविण्यात आला आहे. कचर्‍यावर विघटनाची प्रक्रिया करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून बुलढाणा नगर परिषदेने युनिटही उभारले आहे.
मात्र काही महिन्यापूर्वी अचानक बुलढाणा नगर परिषदेने हनवतखेडचा कचरा डेपो शहरापासून ७ किलोमिटर अंतरावर माळविहीरच्या ई लास जमिनीवर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालिन जिल्हाधिकार्‍यांनी त्याला मंजूरीही प्रदान केली आहे. आम्हांला विश्वासात न घेता, आमची मंजूरी न घेता, कचरा डेपो आमच्या भागात करणे अन्यायकारक आहे’, या भूमिकेसह माळविहीर ग्रामस्थांमध्ये आक्रोश आहे. आज या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी निर्णयाचा विरोध करतांना विविध कारणे दिली आहेत.
मार्गावर तीन शाळा आहेत. पोदार, सेंट जोसेफ, जे.जे. स्कूलच्या लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कचरा डेपोमुळे धोका निर्माण होणार आहे, माळविहीरच्या या कचरा डेपो परिसरातील पावसाचे पाणी प्रवाहातून डोंगरदर्‍यावाटे पलढग धरणात जावून तो प्रकल्प आणि डोंगर प्रदूषित होणार आरोग्यावर दुष्परिणाम करणारा हा कचरा डेपो कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.