cholesterol अनेक आजार शरीरात वेगाने बळावतात पण त्यांची लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत, असाच एक सायलेंट आजार म्हणजे कोलेस्टेरॉल होय. हृदयावर ताण आल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, जो पुढे जाऊन घातक ठरू शकतो. एरवी पूर्णपणे फिट दिसणारे तरुण-तरुणीसुद्धा या आजाराला सहज बळी पडू शकतात. शरीरात कोलेस्टेरॉलची निर्मिती वाढल्यास त्याला 'हायपर कोलेस्ट्रोलेमिया' असे म्हटले जाते.
शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते: कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) आणि जास्त घनतेचे लिपोप्रोटीन (HDL). आहाराच्या तुलनेत शारीरिक हालचालींचा अभाव असणे आणि फास्ट फूड, जंक फूड किंवा भरमसाठ तेलाचा वापर केलेले पदार्थ खाणे ही कोलेस्टेरॉल वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. जर रक्तातील प्रमाण २०० mg/dl असेल तर चिंतेची गरज नाही, परंतु प्रमाण २०० ते २३९ mg/dl दरम्यान असेल तर ते वाढू लागल्याचे संकेत आहेत. जर प्रमाण २४0 mg/dl किंवा त्याहून अधिक असेल, तर हे हाय कोलेस्टेरॉल असून याद्वारे हृदयविकाराचा धोका सर्वाधिक बळावतो.
कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे सोपे उपाय:
दररोज जास्तीत जास्त उकळलेले पाणी प्यावे आणि सकाळी तुळशीची २ ते ४ पाने स्वच्छ धुऊन चावून खावीत.
सकाळी एका ग्लासात लेमनग्रास तेलाचे ५ थेंब टाकून ते पाणी प्यावे किंवा कोमट पाण्यात लिंबू पिळून सेवन करावे.
दररोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी लसणाच्या २ ते ४ पाकळ्या चावून खाव्यात किंवा लसणाच्या गोळ्या घ्याव्यात, तसेच आहारात लसूण, नारळाचे तेल आणि कॉड लिव्हर ऑइलचा मर्यादित वापर करावा.
ओमेगा-३ च्या गोळ्यांसोबतच ब३, क आणि ई जीवनसत्त्वे मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे आणि दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी दही खावे. फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ, तसेच साखर, मैदा, बेकरी उत्पादने, चिप्स आणि वेफर्स खाणे पूर्णपणे टाळावे आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. दररोज किमान एक तास योगासने करावीत आणि चालणे-फिरणे सुरू ठेवावे.