ढाका,
bangladesh रूपपूर अणु प्रकल्पासाठी युरेनियम घेऊन येणाऱ्या बांगलादेशच्या विमानाला पाकिस्तानने परवानगी नाकारली. रशियावरून निघालेल्या विमानाला पाकिस्तानने हवाई हद्दीत प्रवेश देण्यास मनाई केल्याने विमानाला माघारी परतावे लागले.
बांगलादेश अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे युरेनियम रशियाकडून आयात करतो. बांगलादेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनाम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, रूपपूर प्रकल्पासाठी रशियातून युरेनियम घेऊन येणाऱ्या कार्गो विमानाला पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारल्याने युरेनियम ठरलेल्या वेळी बांगलादेशात पोहोचू शकले नाही. त्यांनी प्रवेश नाकारण्याचे कारण सांगितले नाही. पाकिस्तानने अमेरिकेच्या सांगण्यावरूनच रशियाकडून बांगलादेशाला जाणारे कार्गो विमान अडवल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशवर रशियन प्रभाव वाढू नये, असे वाटत असल्यानेच अमेरिकेने पाकिस्तानमार्फत हे कृत्य केले. मात्र, बांगलादेश सरकारने अद्याप याची पुष्टी केली नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.