तस्करांच्या तावडीतून 26 गोवंशांची सुटका

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
Cattle smugglingट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून वाहतूक करण्यात येत असलेल्या 24 गोवंशाची रामनगर पोलिसांनी तस्करांच्या तावडीतून सुटका केली. या कारवाईत ट्रकसह एकूण 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी ट्रकचालकाला जागीच अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. ही कारवाई येथील सावरकर चौकात गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.40 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
 

goo 
पोलिस पथकाने सावरकर चौक परिसरात पहाटेच्या सुमारास नाकाबंदी लावली. सकाळी 7.40 वाजताच्यासुमारास शंकास्पद रीतीने येणारा आयशर ट्रक पोलिसांनी अडवला. ट्रकची पाहणी केली असता त्यात अत्यंत क्रूरतेने कोंबून नेले जाणारे 24 गाई आणि 2 बैल असे एकूण 26 गोवंश आढळून आले. हे सर्व गोवंश अंदाजे 8 ते 12 वर्षे वयाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
पोलिसांनी घटनास्थळावरून 15 लाख रुपये किमतीचा ट्रक, 5 लाख 20 हजार रुपये किमतीचे 26 गोवंश, 20 हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एकूण 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक प्रशांत बालाजी जुमनाके याला जागीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तर या तस्करीतील मुख्य सूत्रधार मानला जाणारा मुन्ना शेख हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.