सावलीतील खादी ग्रामोद्योगाला उतरती कळा

महात्मा गांधींनी दिली होती दोनदा भेट

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Chandrapur Newsसुती धोतरासाठी प्रसिद्ध असलेल्या सावली येथील खादी ग्रामोद्योगाची शतकाकडे वाटचाल सुरू असताना येथील कामगारांना वेळेवर योग्य मोबदला मिळत नसल्याने तसेच ईमारत व कामगारांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने या खादी ग्रामोद्योगाला उतरती कळा लागली आहे. महात्मा गांधी या केंद्राला एकदा नव्हे, तर दोनदा भेट दिली होती, हे विशेष.
 

dhaga 
 
 
संपूर्ण भारतात सावली येथील धोतराची मागणी होती. या ग्रामोद्योगाची माहिती कळताच महात्मा गांधी यांनी सावलीच्या या केंद्राला सन 1933 आणि 1936 असे दोनदा भेट देऊन पाहणी केलीं. तसेच या उद्योगाला चालना देण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ सुरू केली. परंतु, नंतरच्या काळात या खादी ग्रामोद्योगाकडे मोठ्या प्रमाणात शासनकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याने येथील उद्योगाला बाजारपेठेची प्रतीक्षाच करावी लागत आहे. सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाच्या माध्यमातून पूर्वी सुतकताई, विणाई, रंगाई केली जात असे. मात्र आता फक्त सुतकताईच केल्या जाते.
 
 
ग्रामोद्योगात सध्या जवळपास 100 कामगार असून, प्रति गुंडी 15 रुपये कताई दिल्या जाते. परंतु, सध्या कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने महिनाभरापासून कताई बंद आहे. एकेकाळी बारमाही रोजगार देणार्‍या या उद्योगाला कामगार कल्याण मंडळाच्या अभावी व कामगारांच्या समस्यामुळे उतरती कळा लागली आहे.