दिवेआगर येथील समुद्रकिनारी मोठी दुर्घटना!

आळंदी मधील आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
रायगड,
diveagar-beach-drowning-incidentजिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी एक मोठी आणि सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले आठ जण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
 

raygad
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे फिरण्यासाठी आली होती. किनाऱ्यावर आनंद लुटत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ८ जण समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बुडलेल्या आठही जणांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
 
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून पर्यटकांना समुद्रात उतरताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.