लक्षवेध योगनृत्य परिवाराचा द्वितीय वर्धापनदिन

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Lakshavedh Yoga-Dance Family उदयनगर बगीच्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लक्षवेध योगनृत्य परिवाराचा द्वितीय वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त २७ सप्टेंबर रोजी डॉ. तेजल तांबे, डॉ. उज्ज्वल तांबे व डॉ. सिमरन इंकाने यांच्या नेतृत्वाखाली साधकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यात १३० हून अधिक सदस्यांची रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली.
 

babi 
 
 
यावेळी डॉ. उज्ज्वला तांबे, अजय चव्हाण, शिवश्याम सिंग, गौरी अंजनकर, माधुरी उईके, वीणा पगारे व वंदना पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. सायंकाळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.उदयनगर येथील हनुमान मंदिरात सुगम, चित्रपट व भक्तिसंगीतासह सामूहिक ठेका नृत्याचा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध गायक मुकुल पांडे, शेखर झाडगावकर, विलास वैद्य, उमेश चांद्रायण, संजय पुल्लरवार व कुमार केळकर यांनी सादरीकरण केले. पर्यटन दिनानिमित्त पर्यटन लेखक व मुक्त पत्रकार श्रीकांत पवनीकर यांचे विशेष स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रकला मेश्राम यांनी केले. योगेश बन यांनी आभार मानले.
सौजन्य : श्रीकांत पवनीकर ,संपर्क मित्र