मुंबई,
lalbagcha raja 2026गणेशोत्सवात यंदाही लालबागचा राजाचरणी भाविकांनी दर्शनसाठी मोठी गर्दी केली होती. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाचरणी आपल्या मनातील इच्छा बोलून दान अर्पण केलं आहे. भाविकांनी गतवर्षी राजाचरणी बोललेल्या इच्छांची पूर्तता झाल्याबद्दलही राजाचरणी दान अर्पण करुन आपली श्रद्धा जपली आहे. यंदा लालबाग राजाचा चरणी 12 दिवसात तब्बल सहा कोटींचं दान भाविकांनी अर्पण केलं आहे. त्यामध्ये, मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, एका भाविका तब्बल 1 कोटी 48 लाख रुपयांचे 1 किलो सोन्याची वीट देखील राजाचरणी अर्पण केलं आहे.

लालबागचा राजाचरणी अर्पण करण्यात आलेल्या मौल्यवान आणि इतरही वस्तूंचा आज लिलाव होत आहे. त्याच अनुषंगाने लालबागचा राजाचरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या बिस्कीटांचीही माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवात लालबागचा राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा आज लिलाव करण्यात येत आहे. लालबागच्या राजाला यंदा एका अज्ञात भाविकांने तब्बल एक किलो 24 कॅरेटची सोन्याची वीट अर्पण केली आहे. या सोन्याच्या वीटेची किंमत 1 कोटी 48 लाख रुपये आहे. तर, एका अज्ञात भाविकाने 18 कॅरेट सोन्याची मूर्ती अर्पण केली असून 141 ग्रॅम वजनाची ही गणेश मूर्ती आहे. या गणेश मूर्तीची किंमत 15 लाख 65 हजार रूपये आहे.
तसेच, अनेक सोन्याचे दागिने, मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेटच्या बॅट, आणि दोन मोटर बाईक हेही यंदाच्या लालाबागचा राजा चरणी अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंच्या लिलावाचे मुख्य आकर्षण आहेत. त्यामुळे, आपल्या लाडक्या बाप्पाचरणी भाविकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भरभरून दान केलं आहे.