कुरखेडा,
dr-ravindra-vikhar दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र विठोबा विखार यांच्या ’भारतीय सामाजिक विचारवंत’ या पुस्तकाचे विमोचन दंडकारण्य संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अतिशय सोप्या भाषेमध्ये व अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तकाची रचना केलेली आहे. सदर पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून बांधणी व टंकलेखन अचूक केलेली आहे. सदर पुस्तक केवळ बि. ए. अंत्यच्या विद्यार्थांनाच होणार नसून स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करणार्या अनेक विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा लाभ होणार आहे, असे सांगत डॉ. रविंद्र विखार यांचे अभिनंदन करीत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्यात.
यापूर्वीही डॉ. रविंद्र विखार यांची अनेक पुस्तके विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासमंडळाच्या विविध अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीपुणे अंतर्गत विविध पुस्तकांचे लेखन व समीक्षण त्यांनी केलेले आहे. विद्यापीठाअंतर्गत बिए समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करणार्या अनेक विद्यार्थी त्यांची पुस्तके अभ्यासत आहेत.