क्रिेकेटप्रेमींसाठी मोठी बातमी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीत मोठे फेरबदल

आयसीसीकडून प्लेईंग कंडिशन्स जाहीर

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
दुबई
changes in cricket आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटमधील विविध प्रकारांच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) प्लेईंग कंडिशन्समध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. खेळात होणारा अनावश्यक वेळकाढूपणा रोखणे, चेंडूंचे आकारमान आणि वजन प्रमाणित करणे तसेच क्षेत्ररक्षणाशी संबंधित नियमांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे, हा या सुधारणांमागील मुख्य उद्देश आहे. हे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून किंवा त्यानंतर सुरू होणाèया सर्व आंतरराष्ट्रीय मालिकांना लागू होणार असून सध्या सुरू असलेल्या मालिका जुन्या नियमांनुसारच खेळवल्या जातील.
 
icc
मेरिलेबोन क्रिकेट क्लबच्या सुधारित क्रिकेट नियमावलीचा आधार घेऊन तयार करण्यात आलेली ही नवी नियमावली आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या बदलांचे स्वागत करताना सांगितले, खेळघचा वेग वाढवणे, क्षेत्ररक्षणाचे नियम स्पष्ट करणे आणि चेंडूंच्या मानकांसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आधुनिक क्रिकेकटची गरज ओळखून आणि खेळाची विश्वासार्हता व सातत्या अबाधित ठेवूनच हे बदल अमलात आणण्यात आले आहेत.

सर्व प्रकारांसाठी लागू होणारे महत्त्वाचे बदल
1. वेळकाढूपणा करणाèया फलंदाजांवर दंडात्मक कारवाई : फलंदाजांनी ठरवून दिलेल्या वेळेत चेंडूचा सामना करण्यासाठी तयार होणे आता बंधनकारक असेल. फलंदाजाने वेळकाढूपणा केल्यास पहिल्या चुकीवर औपचारिक इशारा, दुसèयांदा अंतिम इशारा दिला जाईल. मात्र, तिसèयांदा किंवा त्यानंतर प्रत्येक वेळी अशाच प्रकारचा वेळकाढूपणा आढळल्यास क्षेत्ररक्षण करणाèया संघाचा थेट पाच पेनल्टी धावा दिल्या जातील. गंभीर आणि वारंवार होणाèया उल्लंघनावर आयसीसीच्या आचारसंहितेनुसार कारवाई होऊ शकते.
2. क्रिकेट चेंडूची स्वतंत्र मानके निश्चित : आतापर्यंत उत्पादकांकडून महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी अनेकदा एकाच प्रकाचा चेंडू वापरला जात असे. मात्र, नव्या नियमांनुसार, पुरुष, महिला आणि कनिष्ठ क्रिकेट अशा तिन्ही स्तरांसाठी चेंडूचे वजन आणि आकारमान यांची स्वतंत्र आणि अचूक मानके निश्चित करण्यात आली आहेत.
याशिवाय ओव्हर थ्रोची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असून बॉल सेटल संदर्भात पंचांचे अधिकारही नमूद करण्यात आले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दिवसाच्या सामन्यात गुलाबी चेंडूचा प्रायोगिक वापर केला जाणार आहे.