नागपूर,
path-cleared-for-parking-in-shegaon शेगाव येथील खळवाडी परिसरातील सिंधी नागरिकांच्या पुनर्वसनासाठी घेण्यात आलेल्या जागेसंबंधीचा वाद मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने संपुष्टात आणला आहे. यामुळे आता संत गजानन महाराज संस्थानचा वाहनतळ पार्किंगचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

२0१४ मध्ये १४ नागरिकांनी लिज संपली होती. राज्य शासनाने त्यांना लिजचे नूतनीकरण करण्यासंबंधी ठराविक रक्कमेचा भरणा करून लिजचे नूतनीकरण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. १४ लिज धारकांनी यावर आक्षेप घेतला. हा आक्षेप अमरावती विभागीय आयुक्तांनी खारीज केला. त्याविरूध्द १४ अतिक्रमणधारकांनी महसूलमंत्र्यांकडे अपील केले. हे अपील मंजूर करण्यात आले आणि विभागीय आयुक्तांना पुन्हा नवीन आदेश देण्याचे निर्देश देण्यात आले. याविरूध्द गजानन महाराज संस्थानने हायकोर्टात रिट याचिका दाखल केली. ही याचिका हायकोर्टाने मंजूर करीत महसूलमंत्र्यांचे आदेश रद्द केले. आता १४ ही अतिक्रमण धारकांना ही जागा वाहन तळासाठी गजानन महाराज संस्थानला देणे बंधनकारक आहे. गजानन महाराज संस्थानतर्फे अॅड. अरूण पाटील यांनी बाजू मांडली.