मुंबई
lalit prabhakar अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. ‘जुळून येतील रेशिमगाठी’ या मालिकेतून ललितने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. आता तो ‘प्रहार’ या आगामी चित्रपटात दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेची सध्या चांगलीच चर्चा असून, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ललित प्रभाकरला कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर त्याच्यासाठी खास प्रतिक्रिया व्यक्त केली. तिने चित्रपटाचा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत ललितच्या अभिनयाचे कौतुक केले. आदित्यच्या भूमिकेपेक्षा कसाबच्या भूमिकेत ललित आपल्याला अधिक आवडल्याचे तिने म्हटले. हा ट्रेलर जणू ललितसाठीच तयार करण्यात आला आहे, असेही प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
मात्र, या चित्रपटाचा lalit prabhakar पहिला दिवस, पहिला शो पाहण्याची इच्छा असूनही ते शक्य होणार नसल्याची खंतही प्राजक्ताने व्यक्त केली. ललितमुळेच आपल्याला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहता येणार नसल्याचे तिने मिश्कीलपणे सांगितले आहे.दरम्यान, ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी लवकरच ‘शुभमंगलमय जोडी दंगलम’ या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याने प्राजक्ताला ‘प्रहार’चा पहिल्या दिवसाचा पहिला शो पाहता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.‘प्रहार’ या चित्रपटाची कथा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्याभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर कसाबची भूमिका साकारत आहे, तर अभिनेता राजकुमार सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ललितच्या या वेगळ्या भूमिकेकडे आणि चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.