नागपूर,
Ramkrishna Wagh College करिअर कट्टा उपक्रमांतर्गत रामकृष्ण वाघ महाविद्यालयात फायनान्स क्लबची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, बचत, गुंतवणूक, बँकिंग व्यवहार व आर्थिक नियोजनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा क्लबचा उद्देश आहे.
यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, प्रा. दीपक ठाकरे, प्रा. किरण पांडे उपस्थित होते. सहाय्यक प्रा. मोहिनी सोनवणे यांची क्लब समन्वयक, तर सानिया कान्हारकर यांची क्लब लीडर म्हणून निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन सत्रे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सौजन्य:सायली लाखे पिदळी ,संपर्क मित्र