नागपूर
State-level Lathi Competition ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरात झालेल्या सातव्या राज्यस्तरीय लाठी स्पर्धेत बेस स्कूल ज्युनिअर कॉलेज, कोराडी येथील विद्यार्थिनी विधी सुभाष नारनवरे हिने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत सुमारे ३०० ते ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
विधीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिचीराष्ट्रीय लाठी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गुजरात येथे १० व ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्राचे वर्किंग प्रेसिडेंट किरण यादव व महागुरू सुभाष मोहिते यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. विधीच्या यशाबद्दल विद्यालयाचे संचालक दिनेश गौर, सोनू बुर्रेवार, नरेंद्र वानखेडे, प्राचार्य गौरव माहुले, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक लाल सिंह यादव तसेच शिक्षक-शिक्षिकांनी तिचे अभिनंदन केले.
सौजन्य:लालसिंग यादव,संपर्क मित्र