दोन दुचाकीच्या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू : एक गंभीर

गोंदिया -गोरेगाव मार्गावरील मिलटोली-हिरडामाली दरम्यान घटना

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
Three killed in accident in Gondia दोन दुचाकीच्या भीषण रस्ते अपघातात तिन युवकांचा जागीच मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गोंदिया -गोरेगाव राष्ट्रीय राज्यमहामार्गावरील हिरडामाली-मिलटोलीदरम्यान घडली. जखमीला उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पियूष योगेश बारेवार रा. गोरेगाव, मनोज कूरजेकर व विनय कोहरे दोघेही राहणार सोनी ता. गोरेगाव अशी मृतांची नावे असून जखमी युवक गोरेगाव येथील मानकर यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर तिन्ही मृत युवक एकमेकांच्या परिचयाचे असल्याचे कळले.
 
 

qwaew45 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पियुष व त्याचा मित्र बुधवारी गोंदिया येथील गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते, मिरवणूक पाहून रात्री ११.३० वाजताच्या सुमारास परत येत असताना हिरडामाली-मिलटोली परिसरात हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता एवढी होती की संबंधित वाहनाचा अक्षरशः चुराडा चुराडा होत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पियुषचा मित्र मानकर हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे गोरेगाव तसेच सोनी परिसरात शोककळा पसरली आहे.