डॉ. नितीन पाटील यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
नागपूर
University of Animal and Fisheries Sciences महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यकारी परिषद सदस्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

bagi 
 
 
विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीत डॉ. पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा विद्यापीठाच्या प्रगतीत मोलाचा वाटा राहिला असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.यावेळी संचालक (शिक्षण) तथा अधिष्ठाता (पशुविज्ञान) डॉ. शिरीष उपाध्ये तसेच माफसू कास्टट्राइब संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण बागडे उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. पाटील यांना निरोगी, आनंदी आणि समाधानकारक भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:प्रवीण बागडे,संपर्क मित्र