‘एसआयआर’च्या तक्रारींवर तोडगा
चंद्रपूर,
voters-no-longer-need-to-attend-a-hearing ज्यांचे नाव मतदारांच्या नव्या याद्यांमध्ये आले नाही, त्यांना प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आले. मात्र, संबंधित बीएलओ अशा मतदारांची काळजी घेत नसल्याची तक्रारी होत्या. तुम्ही नोटीस स्वीकारा आणि सुनावणीसाठी आमच्याकडे या, अशी उत्तरे दिली जात होती. त्यावर प्रशासनाने तोडगा काढला असून, आता मतदारांना सुनावणीसाठी बीएलओकडे जाण्याची गरज नाही. व्हाट्सअॅपद्वारे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
मतदार याद्या अद्ययावतीकरण, याद्यांचे सखोल पुनर्रीक्षणासाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ काम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या निर्देशानुसार, आता नागरिकांना सुनावणीसाठी ईआरओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. बीएलओ आता घरी येऊन अथवा व्हाट्सअॅपवरूनच आपल्याला नोटीस पाठवतील व नागरिकांनादेखील घरबसल्या व्हॉट्सअॅपवरून दिलेल्या सुचनांचे पालन करीत संबंधित कागदपत्रांसह पुरावे सादर करता येतील आणि स्थानिक पातळीवर ते नियमांनुसार ग्राह्य धरल्या जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुुमना पंत यांच्या आदेशानुसार, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी बीएलओ यांनी प्रत्येक घरी जाऊन मतदारांची पडताळणी करणे बंधनकारक केले. मात्र, शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांत बीएलओ घरोघरी जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात. तसेच, निवडणूक विभागाकडून मतदारांना कायदेशीर सुनावणीसाठी नोटीसा बजावल्या जात आहेत. मात्र, ही नोटीस मिळाल्यानंतर पुढे नक्की कोणत्या कार्यालयात जायचे, कोणते पुरावे सादर करायचे आणि वेळेवर अधिकारी भेटणार का, याबद्दल प्रशासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. पूर्वी नोटीस पाठवल्यानंतर ती पूनःतपासणीसाठी ईआरओ कडून डीईओ कडे येत होती आणि डीईओकडून ते अधिकृत शिक्कामोर्तब होत असे.
आता कार्यालयात येण्याची गरज नाही : संजीव देशमूख
नागरिकांना बिएलओमार्फत नोटीस देण्यात येत असून, ती मराठी आणि इंग्रजी दोन भाषेत आहे. नोटीसच्या पाठीमागे कोणकोणती कागदपत्रे कशी जोडायची या संदर्भात तपशीलवार माहिती दिली आहे. त्यामुळे नोटीस आल्यानंतर त्यावर दिलेल्या सुचनेनुसार, मतदारांना व्हॉट्सअॅपवरून कागदपत्रे पाठवायची आहेत व्हॉट्सअपवर आलेला पूरावा बीएलओ तपासून अपलोड करतील. त्यानंतर ते ग्राह्य धरल्या जाईल, असे उप जिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख यांनी ‘तभा’ला सांगितले.