लोअर वर्धा धरणावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प!

३ हजार कोटींची गुंतवणूक

    दिनांक :01-Oct-2026
Total Views |
१ ऑक्टोबर
wardha-floating-solar-projectआर्वी तालुक्यातील लोअर वर्धा धरण धनोडी येथील प्रकल्पावर ३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणार्या ५०५ मेगावॅट क्षमतेच्या महाराष्ट्रातील पहिल्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला महानिर्मितीने मंजुरी देत अधिकृत निविदा प्रसिद्ध केली आहे. कागदावरील संकल्प प्रत्यक्षात आणून दाखवण्याच्या आ. सुमित वानखेडे यांच्या या धडाक्यामुळे मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.

dam 
लोअर वर्धा धरणाचा परिसर हा परिसरातील शेतकर्यांसाठी जीवनदायिनी मानला जातो. आ. वानखेडे यांनी यापूर्वी याच धरणावर शेतकर्यांच्या समृद्धीसाठी सूक्ष्म सिंचन योजना मंजूर करून आणली होती. त्या पाठोपाठ आता याच धरणाच्या पाटावर ५०५ मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि १०१० मेगावॅट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे दरवर्षी कोळशाचा वापर ८ लाख ४९ हजार टनांनी कमी होण्यास मदत होईल आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन घटेल. पर्यावरणाचा समतोल राखणारा हा प्रकल्प आर्वी विधानसभा क्षेत्राची आर्थिक घडी मजबूत करेलच, शिवाय स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध करून देईल.
विधानसभा निवडणुकीच्या काळात आ. वानखेडे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ऊर्जानिर्मितीसाठी या प्रकल्पाचा संकल्प जाहीर केला होता. केवळ पोकळ आश्वासने न देता, अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत शासकीय पातळीवर सातत्याने आणि प्रभावी पाठपुरावा करून त्यांनी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करून दाखवली आहे. तळेगाव येथील ३०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय असो, स्थानिक एमआयडीसीचा विस्तार असो वा आता लोअर वर्धा धरणावरील हा ३ हजार कोटींचा सौर प्रकल्प, प्रत्येक घोषणा ही प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.