अमोल मिटकरींचा बॉलीवूडवर संताप

नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला हिंदी कलाकारांची अनुपस्थिती

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
मुंबई
amol mitkari हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने आणि आक्रमक शैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकाने आणि रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर आणि कार्डियाक मसाज देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. त्यानंतर पुण्याजवळील डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

amol mitkari questions bollywood stars 
हिंदी कलाकारांच्या अनुपस्थितीवरून मिटकरींचा सवाल
नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्रमुख कलाकारांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी बॉलीवूडमधील काही कलाकारांवर टीका केली आहे.नानांचा साधेपणा, मातीशी असलेले त्यांचे नाते आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य काही बॉलीवूड कलाकारांना खटकत होते का, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला. तसेच, बॉलीवूडमधील काही मंडळींनी मराठी माणसाबद्दलचा द्वेष थांबवावा, अशी टीकाही त्यांनी केली.अंत्यसंस्काराला उपस्थित न राहता केवळ सोशल मीडियावरून श्रद्धांजली व्यक्त करणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील कलाकारांनाही मिटकरी यांनी लक्ष्य केले. नाना पाटेकर यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान आणि शेतकऱ्यांसाठी केलेले सामाजिक कार्य लक्षात घेता, त्यांच्या अंत्यसंस्काराला कलाकारांनी उपस्थित राहायला हवे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे नानांच्या अंत्यसंस्काराला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीचा मुद्दा चर्चेत आला आहे.